येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरात पोलीस आयुक्तालयाने कोरोना प्रतिबंधक कारवाईमध्ये सोमवारी २४ मे रोजी ३,०५६ वाहनांची तपासणी करून २,९२,००० रुपये दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्याने ३५४ व्यक्तींवर कारवाई करून १,७७,५००० रुपये दंड वसूल करण्यात आला. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याने ४६२ व्यक्तींना १,११,५०० रुपये दंड करण्यात आला. नाकाबंदी दरम्यान ५७ वाहने जप्त करण्यात आली. नियमांचे उल्लंघन केल्याने ३ आस्थापनांवर कारवाई करून ३,००० रुपये दंड वसूल करण्यात आला.