येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत रविवारी नऊ मे रोजी पोलीस आयुक्तालयाने सोलापूर शहरात १,९६२ वाहनांची तपासणी करून २,६३,५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरता फिरणाऱ्या 397 नागरिकांनी विरुद्ध कारवाई करीत १,९८,५०० रुपये दंड करण्यात आला. दोन आस्थापनांना नियमांचे उल्लंघन केल्याने २२,००० रुपये दंड करण्यात आला. मोटार वाहन कायद्याअंतर्गत १९९ व्यक्तींविरुद्ध कारवाई केली असून त्यांच्याकडून ४३,००० रुपये दंड वसूल करण्यात आला.