सोलापूर : शहरात पोलीस आयुक्तालयाने २९ जून रोजी केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये १ लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या ११४ व्यक्तींवर कारवाई करून ५८ हजार पाचशे रुपये दंड करण्यात आला . शहर वाहतूक शाखेने १९३ व्यक्तींवर कारवाई करून ई चलनाद्वारे ५७ हजार ७०० रुपये वसूल केले. तसेच चार जणांविरुद्ध विना मास्क फिरत असल्याने कारवाई करून २,००० रुपये दंड वसूल केला.