येस न्युज नेटवर्क : आयपीएलच्या 15 व्या हंगामावर देखील आता कोरोनाचं सावट गडद होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचे फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता आणखी एका खेळाडूला देखील कोरोनाची बाधा झाल्याने दिल्ली संघाने आगामी सामन्यासाठी पुण्याला जाणं रद्द केलं आहे. तसंच संपूर्ण संघाला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. क्रिकबज या वेबसाईटने याबाबत वृत्त दिलं असून संबधित खेळाडूची आरटी-पीसीआर टेस्ट देखील केली जाणार आहे.
दिल्लीचा पुढील सामना 20 एप्रिलला
ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीचा पुढील सामना बुधवारी 20 एप्रिल रोजी पुण्यातील एमसीए मैदानात खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्स विरुद्ध हा आयपीएल 2022 मधील 32 वा सामना असणार आहे. त्यासाठी संघ आज पुण्याला रवाना होणार होता. पण खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याने वेळापत्रकात आता बदल करण्यात येणार आहे.