येस न्युज मराठी नेटवर्क :(समाधान रोकडे) ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग कमी होत नसल्याचे दिसून आल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ज्यादा रुग्ण आढळलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 137 हॉटस्पॉट गावांची यादी तयार केले असून यामध्ये उत्तर सोलापुरातील दहा गावांचा समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे.उत्तर सोलापूर तालुक्यातील बी बी दारफळ या गावात कोरोना रुग्ण 219,नान्नज 194,वडाळा 245, कलमन 108,रानमसले 95,पाकणी 131,कोंडी 146,मार्डी 186 ,हिप्परगा 101 तर तिऱ्हे या गावात 102 एवढी रुग्ण संख्या आहे.हॉटस्पॉट झालेल्या गावाची सर्व जबाबदार सरपंच व ग्रामसेवक तसेच तलाठी यांच्या नेतृत्वाखाली जी दक्षता समिती नेमली आहे ते ता वाढणाऱ्या रुग्णावर नियंत्रण ठेवणारा आहे.