येस न्युज मराठी नेटवर्क । ‘लव्ह जिहाद’ चा आता दिवसेंदिवस अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, भाजपाशासीत राज्यांमध्ये ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध कडक कायदे तयार केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. “देशात सुरू असलेल्या सामूहिक धर्मांतराच्या घटना थांबायला हव्यात, विवाहासाठी धर्मांतर मंजूर नाही.” असं त्यांनी म्हटलं आहे.
मध्य प्रदेश सरकारने जबरदस्ती धर्मांतरांविरोधातील अध्यादेशास मंजुरी दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी (आज) एएनआय वृत्तसंस्थेस दिलेल्या मुलाखतीत बोलताना केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवरील प्रश्नांना उत्तर दिली. ज्यामध्ये भारत-चीन सीमा वाद, शेतकरी आंदोलन या मुद्यांचा प्रामुख्याने समावेश होता.
‘लव्ह जिहाद’ च्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलातान राजनाथ सिंह म्हणाले, “आमचं असं म्हणण आहे की धर्मांतर व्हायलाच कशाला हवं? मी पाहतो आहे अनेक ठिकाणी सामूहिक धर्मांतर होत आहे. हे थांबलं पाहिजे. जिथपर्यंत मुस्लीम समाजाचा प्रश्न आहे, मुस्लीम समाजामध्ये माझ्या माहितीनुसार असू शकतं त्यात कुठं काही कमी असेल. की एखाद्यावेळेस अन्य समाजातील लोकांशी मुस्लीम समाजातील लोकं विवाह करू शकत नाहीत. विवाहासाठी धर्मांतर करायला लावणं, याला मी वैयक्तिकदृष्टीने योग्य मानत नाही.”