येस न्युज मराठी नेटवर्क : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ६१ डॉलरपुढे गेल्याने कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. गुरुवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये अनुक्रमे १५ पैसे आणि ३० पैशांची वाढ केली. बुधवारी पेट्रोल ३० पैसे आणि डिझेल २५ पैशांनी महागले होते.पेट्रोलियम कंपन्यांनी नव्या वर्षात आतापर्यंत १५ वेळा इंधन दरवाढ केली आहे. यात आतापर्यंत पेट्रोल ४ रुपये ४ पैशानी महागले आहे तर डिझेल ४ रुपये १६ पैशानी महागले आहे.