क्रेडाई सोलापूर व वुमन्स विंग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार दिनानिमित्त बांधकाम कामगारांप्रति कृतज्ञता आठवडा अंतर्गत कामगार नोंदणी व कामगार कार्ड वाटप कार्यक्रम घेण्यात आला, अश्या प्रकारचा कार्यक्रम पूर्ण राज्यात क्रेडाई द्वारे राबविण्यात येत आहे. या प्रसंगी सरकार कामगार अधिकारी अय्युब पठाण, विलास गायकवाड सह क्रेडाई नॅशनल उपाध्यक्ष सुनिल फुरडे, क्रेडाई नॅशनल चे समिती सदस्य शशिकांत जिड्डीमनी , क्रेडाई सोलापूर अध्यक्ष अभय सुराणा, सचिव संतोष सुरवसे सह वुमेन्स विंग च्या रूपा सुराणा, दीपाली गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी रूपा सुराणा यांनी स्वागत केले तर अध्यक्ष अभय सुराणा यांनी प्रास्ताविक केले.
अय्युब पठाण यांनी क्रेडाई सोलापूरचे या उपक्रमाचे कौतुक करीत कामगारांना सरकार द्वारे लागू योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सुनील फुरडे यांनी गौरवदगार काढत या योजने अंतर्गत मिळणाऱ्या विशेष लाभांचा उहापोह केला.या कार्यक्रमात स्वच्छता विषयी डाँ. प्रियांका जिड्डीमनी यांनी कामगारांना मार्गदर्शन केले तर किमया ग्रुपचे सेफ्टी ऑफिसर मौला उस्ताद यांनी कामगारांना साईट सुरक्षा विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सुमारे १३८० कामगार नोंदणी झाली असून सुमारे ३७० कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर रक्तदान शिबिरात सुमारे १५० कामगारांनी रक्तदान केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन नागनसुरे यांनी केले. कार्यक्रमास संकेत थोबडे, आनंद पाटील, राजीव दिपाली ,जयेश पटेल,विरल उदेशी सह क्रेडाई सोलापूर वुमन्स विंगच्या सविता दिपाली, पारुल पटेल, सुमित्रा सुराणा, सविता बिराजदार, लोलगे व कामगार समन्वयक अमोल कांबळे उपस्थित होते. हया कार्यक्रमाचे आयोजन आर्की. शैलेंद्र सुराणा यानी केले.