सोलापूर : सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड, एम.आय.डी.सी. (M.I.D.C. )येथे म.न.पा.च्या नवीन पाण्याचा टाकीजवळ, सोलापूर येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून नवीन अग्निशामक केंद्राची उभारणी करण्यात आले व त्याचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी खासदार धर्मण्णा सादुल, यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, सोलापूर एम.आय.डी.सी. (M.I.D.C.) असोसिएशनचे अध्यक्ष तिलोकचंद कासवा, सोलापूर रेडिमेड असोसिएशनचे राजू कोचर, जितेंद्र ढाकलिया, अग्निशामक केंद्राचे अधिक्षक केदार आवटे आदि. मान्यवर उपस्थित होते.