सोलापूर : दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर येथे २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान जागरुकता रॅली, संविधानाच्या सरनाम्याचे सामुहिक वाचन आणि द. भै. फ . दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान सभेतील महिला सदस्यांचे योगदान या विषयावर भित्तीचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दयानंद शिक्षण संस्था, सोलापूरचे प्रशासक प्रा. डॉ. विजयकुमार उबाळे, द. भै. फ . दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. दामजी, डीएव्ही वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. शिंदे, डी.पी.बी. दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन चे प्राचार्य प्रा. डॉ. एस. बी. क्षीरसागर, डी.जी.बी. दयानंद ला कॉलेज चे प्राचार्य प्रा. डॉ. यु.एम. राव, उपप्राचार्य श्री. खांडेकर सर, सौ.जांभळे मॅडम, राज्यशास्त्र विभागप्रमुखा सौ. मेधा पत्की आदी उपस्थित होते.
यावेळी प्रारंभी संविधानाच्या सरनाम्याचे सामुहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर सौ. मेधा पत्की यांनी मूलभूत कर्तव्ये या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी डी.पी.बी. दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन चे प्राचार्य प्रा. डॉ. एस. बी. क्षीरसागर यांनी उपस्थितांना संबोधित केले. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी संविधान सभेतील महिला सदस्यांचे योगदान या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या भित्तीचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. डॉ. विजयकुमार उबाळे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. नंतर दयानंद शिक्षण संकुलातील चारही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत संविधान जागरुकता रॅली काढण्यात आली. रॅलीचा समारोप प्रसंगी बोलताना दयानंद शिक्षण संस्था, सोलापूरचे प्रशासक प्रा. डॉ. विजयकुमार उबाळे यांनी भारतीय संविधानाचे महत्व विशद करून सर्व विद्यार्थ्यांनी आपली मूलभूत कर्तव्ये पार पाडून लोकशाही अधिक सक्षम बनविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रा. डॉ. एस. बी. क्षीरसागर यांनी केले, संविधानाच्या सरनाम्याचे वाचन प्रा. किडगावकर यांनी केले. यावेळी दयानंद शिक्षण संकुलातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.