सोलापूर : सोलापूर सह जिल्ह्यात बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार चांगला पाऊस झाला. त्यामुळे ज्वारी तसेच रब्बी पिकाला पाण्याची गरज नाही . अनेकांच्या विहिरीमध्ये मुबलक पाणी आहे .सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे ऊसालाही पाण्याची गरज नाही. त्यामुळे सध्या गरज नसताना शिवाय उजनी धरणात कमी पाणी असताना कॅनॉल द्वारे दुधडी भरून पाणी सोडणे सुरू आहे. आगामी तीन-चार महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ त्रिव्र होणार हे दिसत असताना देखील पाणी जपून वापरणे महत्त्वाचे आहे मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. तीन नोव्हेंबर पासून कॅनॉल मधून पाणी सोडणे सुरू केले आहे त्यावेळी धरणात 54% एवढे पाणी होते आज सकाळी साडेआठच्या आकडेवारीनुसार 2700 क्यूसेक वेगाने पाणी सोडणे सुरू होते त्यामुळे धरणाची पातळी 48 टक्क्यावर खाली आली आहे. याबाबत उजनीचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना विचारले असता डिसेंबर महिन्यात सोलापूर महापालिकेसाठी नदीतून पाणी सोडल्यानंतर पाणीपातळी खाली जाईल आणि त्यानंतर कॅनॉल मधून पाणी सोडणे अशक्य आहे म्हणून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार पाणी सोडणे सुरू आहे. आमदारांनी सांगितल्यास पाणी बंद करू असे ते म्हणाले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या टोलवाटोलवी मुळे उजनीतील पाणी संपविण्याचे कारस्थान सुरू आहे का असा अशी शंका निर्माण होते.