श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. ही निवडणूक काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्स एकत्रितपणे लढणार आहेत. माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या दीर्घ बैठकीनंतर ही घोषणा केली.
अब्दुल्ला म्हणाले, आम्ही लवकरच जागावाटपाची घोषणा करू आणि जाहीरनामाही प्रसिद्ध करू. यावेळी, माध्यमांनी पीडीपीलाही सोबत आणण्यासंदर्भात केलेल्या प्रश्नावरही त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली. ते म्हणाले, कुण्याही समविचारी पक्षासाठी आमचे दरवाजे बंद नाहीत. भविष्यात कुठल्याही मुद्द्यावर विचार केला जाऊ शकतो. तसेच, विजयी झाल्यास मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावर त्यांनी हसत उत्तर देणे टाळले.