महाराष्ट्रात इयत्ता सहावी ते दहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एस- क्युस्ट (S-Quest) ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे येणाऱ्या विद्यार्थ्यांना नासा आणि सिंगापूर स्पेस सेंटर या ठिकाणी वैज्ञानिक सहलीसाठी पाठवण्यात येणार होते. या परीक्षेचा निकाल 30 ऑगस्ट 2023 रोजी लागला. यामध्ये सिंगापूर टूर्ससाठी सोलापूर शहर आणि परिसरामधून एकमेव विद्यार्थिनी आदिती विकास ढांगे हिची निवड झाली आहे. हिच्या या निवडीबद्दल पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य समरेंद्र पाणीग्रही यांनीही तिचे अभिनंदन केले. नव्या आयुष्याची, नव्या मार्गाची सुरुवात आहे. अशीच स्वप्नाला गवसणी घालत राहा. परीक्षेत पास झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पालकांचे सुद्धा अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.