सिंधुदुर्ग : साधी सरपंच पदाची निवडणूकही न लढवलेले संजय राऊत निवडणुकीवर बोलतात आणि उद्धव ठाकरे शेमड्यासारखे रडताना दिसले, असं म्हणत भाजप आमदार नितेश राणेंनी टीकास्त्र डागलं आहे. तसेच, ठाकरेंची पत्रकार परिषद आणि राऊतांचं रड गाऱ्हाणं पाहून पुन्हा मोदीच येणार, असंही नितेश राणे म्हणाले आहेत. त्यासोबतच ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत, 4 जूननंतर ते कुटुंब लंडनला पाळण्याच्या तयारीत आहे, असंही नितेश राणे म्हणालेत.
नितेश राणे म्हणाले की, “साधी सरपंच पदाची निवडणूक न लढविलेला संजय राऊत निवडणुकीवर बोलतात आणि त्याचा उद्धव ठाकरे शेमड्यासारखे रडताना दिसले. उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर पराभव म्हणजे नेमकं काय? हे समजतं. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आणि राऊतांच रड गाऱ्हाणं बघून पुन्हा मोदी येणार हे समजलं. ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत, 4 जूननंतर ते कुटुंब लंडनला पाळण्याच्या तयारीत आहे.”
“राज्यातील कालच्या मतदानानुसार महायुतीला मनापासून स्विकारलं आहे, हे दिसून आलं. आमचे उमेदवार घासून नाही ठासून येतात. महायुती 45 चा आकडा गाठतेय. ज्यांनी आयुष्यात एक निवडणूक लढवली नाही. मतदान कस मिळवायचं? हे माहीत नसेल, तो मतदानाची पद्धत शिकवत असेल, तर लाजिरवाणी गोष्ट आहे. गल्लीतल्या तीनपट लोकांना मतदानाचा काही माहीत नसेल, महाराष्ट्राच्या जनतेनं मशाल विजवून टाकली आहे.”, असं नितेश राणे म्हणाले.

