सौ भू म पुल्ली कन्या प्रशालेचा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
सोलापूर – सुखाचा त्याग करून अभ्यासावर लक्ष केंद्रित केलेल्या विद्यार्थ्यांना हमखास यश मिळते . आई , वडील आणि शिक्षकांकडून जीवनाच्या यशस्वीतेसाठी मिळालेले मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे असते. असे मौलिक विचार जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी मांडले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करीत स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आले .यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी ,पोलिस उपायुक्त डॉ वैशाली कडूकर , संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ गड्डम , उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी , सचिव दशरथ गोप यांच्यासह विश्वस्त श्रीधर चिट्याल , श्रीनिवास कटकूर , श्रीनिवास पोशम , गणेश गुज्जा , रामदास पुल्ली , मुख्याध्यापिका गीता सादुल , उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामुल , उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले , पर्यवेक्षिका प्रणिता सामल , अधीक्षक अंबादास रच्चा युवराज मेटे , रेखा पेम्बर्ती , मंजुळा कुडक्याल आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी मुलींच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा आणि पालकांना मुलींचे कौशल्य लक्षात यावे यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन केल्याचे प्रतिपादन प्रास्ताविकातून केले.
यावेळी डॉ वैशाली कडूकर यांनी कन्या प्रशालेत शिकताना स्नेहसंमेलनात मुलांची भूमिका मुलीच बजावत असल्याने कणखरपणा आणि नेतृत्व गुण विकसित होते. पालकांनी आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे असे आवाहन आपल्या मनोगतात व्यक्त केले. सचिव दशरथ गोप यांनी अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या कार्याची माहिती देत कलाकारांना शुभेच्छा दिल्या.
स्नेहसंमेलनात चारशे विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित एकापेक्षा एक बहारदार नृत्य व नाट्य सादर केले. भरतनाट्यम , बंजारा नृत्य , कोळीगीत , जोगवा , तेलुगू गीत , निसर्ग गीत , शिवरायांचे शौर्य गीत , लता मंगेशकर यांची अजरामर गीते इ गीतावर सुंदर नृत्य सादर केले. तसेच पर्यावरण संरक्षण व स्त्री शिक्षणाचे महत्त्व लघुनाट्याद्वारे पटवून दिले. विध्यार्थीनी आणि माता पालकानी संपूर्ण सभागृह खचाखच भरून गेले. प्रसाद विभूते यांनी नृत्य दिग्दर्शन केले. प्रशांत देशपांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला . अश्विनी दास यांनी सूत्रसंचालन केले तर उमा कोटा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.