शेकडो मुलांना वारकरी संस्कार मोफत देणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था – ह. भ. प .सुधाकर इंगळे महाराज
श्री संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्था आयोजित २० एप्रिल पासून चालू असलेल्या वारकरी संस्कार शिबिराचा सांगता समारोपाच्या वेळी बोलताना सुधाकर महाराज म्हणाले, आता काळाची गरज होती अशा संस्कारक्षम शिबिराची. परंतु कोणत्याही मोबदल्याचा विचार न करता मोफत वारकरी प्रशिक्षण देण्यात ही संस्था अग्रगण्य ठरली आहे. महाराष्ट्रभर मी कीर्तनाच्या माध्यमातून फिरतो पाहतो असे संस्था कुठेही पाहण्यास मिळाली नाही. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ह. भ.प. सुधाकर इंगळे महाराज, ऑक्टो पॅडचे प्रशिक्षक श्याम नाईकनवरे,नंदकुमार येचे, बळीराम जांभळे, प्रशिक्षक अनिकेत जांभळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमास ज्ञानेश्वर सपाटे, शेखर फंड, संजय केसरे, चंद्रकांत जांभळे यांची उपस्थिती होती. महिनाभरामध्ये ज्या मुलांनी विशेष प्राविण्य मिळवले अशा विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
गीता पठण मुलींचा विभाग
शर्वरी शिवाजी भोसले
कार्तिकी रत्नदीप काशिद
प्रगती विष्णू शिंदे
मुलांचा विभाग
शौर्य ज्ञानेश्वर भोसले
प्रथमेश ढेरे
सोहम शिंदे.
मृदंग वादन
मुलींचा विभाग
श्रावणी संतोष काकडे
श्रेया सोपान लोहकरे
माधुरी अशोक सोमदळे
मुलांचा विभाग
प्रणव अमोल पवार
श्रेयस नंदकुमार गात
ओम व्यवहारे
सेवार्थ सन्मान
समर्थ कांबळे
स्वराज केसरे
तेजस सुर्वे
अथर्व कोकरे
राजवीर जांभळे
अंजली लोखंडे
प्राची यमगवळी
भक्ती परदेशी
महिनाभरात विशेष सेवा करणाऱ्या सर्वांचा सन्मान करण्यात आला. दीप प्रज्वलन करून ११५ मुलांच्या कडून गीतेचा बारावा अध्याय व पंधरावा अध्याय पठन करून घेण्यात आला. कार्यक्रमाचा सांगता समारोप पसायदानाने करण्यात आला. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी तुकाराम लोखंडे, समर्थ कांबळे स्वराज केसरी, आर्यन खंदारे, अंजली लोखंडे यांनी परिश्रम घेतले.



