सोलापूर : आई-वडिलांकडून घर बांधण्यासाठी दहा लाख लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत तसेच चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक त्रास दिल्याची फिर्याद गेंट्याल टाकीजच्या मागे इंदिरानगर येथे राहणाऱ्या श्वेता विकास धोत्रे या विवाहितेने सासरच्या मंडळींनी विरुद्ध दिली आहे. 2014 मध्ये झालेल्या या विवाहानंतर तब्बल सात वर्षांनी २९ जून २०२१ रोजी ही तक्रार करण्यात आली आहे. श्वेता धोत्रे हिने फिर्यादीत म्हटले आहे की, लग्नानंतर अवघे पाच दिवस व्यवस्थित नांदवल्यानंतर पती सासू यांनी त्रास देण्यास सुरुवात केली . श्वेता धोत्रे हिने पती विकास दत्तू धोत्रे आणि सासू सुलोचना दत्तू धोत्रे दोघेही राहणार महुद रोड, सांगोला यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक वाडीकर अधिक तपास करीत आहेत.
रिक्षांची समोरासमोर धडक, एका प्रवाशाचा मृत्यू
सोलापूर : गुरुनानक चौकातील आनंद सत्संग निवास समोर २८ जून रोजी रिक्षांच्या झालेल्या धडकेमुळे रिक्षातील प्रवासी जखमी झाल्याने आणि अबेदा अब्दुल रौफ कुरेशी ही महिला मृत्यूमुखी पडल्याने सदर बाजार पोलिस ठाण्यात रिक्षाचालक राहुल कडाजी लवटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २८ जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रिक्षा क्रमांक एम एच 13 सिटी 4570 आणि रिक्षा क्रमांक एम एच 13 सिटी 8235 या रिक्षांची समोरासमोर टक्कर झाली होती. रिक्षा भरधाव चालवल्याने आणि रिक्षा तील प्रवाशांना दुखापत झाल्याने तसेच एका प्रवाशाचा मृत्यू झाल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक वाडीकर अधिक तपास करीत आहेत.
टोयाटो गाडी घेणार असल्याचे सांगून कराड बँकेची फसवणूक
सोलापूर : टोयाटो इनोव्हा क्रिस्टा झेड एक्स ही गाडी घेणार असल्याचे सांगून बाळीवेस येथील कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची २१ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सचिन पंडित व्हनमाने, नंदकुमार चीमाजी मेठकरी, सिद्धाराम मल्हारी इंगळे, सरफराज शेख, डेक्कन मोटर्सचे व्यवस्थापक अशा चोघाविरुद्ध बँकेने तक्रार दाखल केली आहे. गुरुनानक चौकातील जिल्हा क्रीडा संकुलातील शॉप नंबर आठ मधील डेक्कन मोटर्सचे मालक सरफराज हुसेन यांनी आरटीओ पासिंग विक्रीची मूळ बील आणि इन्शुरन्स तसेच इतर कागदपत्रे बँकेत जमा करण्याचे मान्य केले होते . परंतु ही कागदपत्रे जमा न केल्याने बँकेने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर मांजरे अधिक तपास करीत आहेत.