सोलापूर । पतीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीचा राग मनात धरून एजाज बागवान, फैयाज बागवान, रियाज बागवान आदी १४ जणांनी अक्कलकोट रोडवरील संगमेश्वर नगर येथील घरावर दगडफेक केल्याची फिर्याद शाहाजरीन आसिफ विजापूरे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात केली आहे. शिवीगाळ करून व तुम्ही इथे कसे राहता ते बघून घेतो, अशी दमदाटीची भाषा वापरली असेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस सब इन्स्पेक्टर मोरे अधिक तपास करीत आहेत.