सोलापूर – महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी आज बाळे येथील आदिला नदीची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,अविनाश अंत्रोळीकर, महेश क्षीरसागर,किशोर सातपुते,प्रकाश दिवाणजी यांच्या सह महामार्ग विभागचे अधिकारी उपस्थिती होते.सोलापूर शहरातील हिपरगा तलाव येथील पाणी पातळी वाढ झाल्यास बाळे येथील आदीला नदी या ठिकाणी पाण्याचा प्रवहा वाढतो त्या मुळे त्या परिसरतील नागरिक वस्ती मध्ये पाणी शिरू नये या करीता आज पाहणी केली असून त्या ठिकाणी विविध उपाय योजना करावे अश्या सूचना मा आयुक्त यांनी अधिकारी यांना दिले.



