येस न्युज मराठी नेटवर्क : बंगलोर येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री सीएम येडीयुरप्पा आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत तेराव्या एयरो इंडिया प्रदर्शनाला प्रारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी तीन एम आय सेवन हेलिकॉप्टर्स या शोमध्ये आत्मनिर्भर फॉर्मेशन फ्लाईट चे प्रदर्शन करण्यात आले .
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हा एरो इंडिया शो तीन दिवसांचा करण्यात आला आहे पहिल्या दिवशी 83 तेजस जेट घेण्यासाठी hcl बरोबर करार झाला.एरो इंडिया शो मध्ये 55 पेक्षा अधिक देशातील अधिकारी, सेना दलाचे प्रमुख ,संरक्षण दलांचे प्रतिनिधी तसेच 80 विदेशी कंपन्या सहभागी झाले आहेत .भारतीय नौदलाने या एअर शोमध्ये ब्रह्मोस मिसाइल प्रदर्शित केले. पाच फेब्रुवारीपर्यंत हा शो चालू राहणार आहे.


