येस न्युज मराठी नेटवर्क । केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) शनिवारी कॉमेडियन भारती सिंहनंतर तिचा पती हर्ष लिंबाचिया यालासुद्धा अटक केली. भारती सिंहच्या घरात अमली पदार्थ आढळून आल्यानंतर एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीत भारतीने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर हर्षलाही अटक करण्यात आली.
एनसीबीने शनिवारी सकाळी खार दांडा परिसरात छापा घातला. कारवाईत अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १५ एलएसडी डॉट्स, ४० ग्रॅम गांजा आणि नायट्रोझेपाम औषध आदी अमली पदार्थ एनसीबीने हस्तगत केले होते. त्याच्या चौकशीतून भारतीचे नाव समोर आले.