भाजपा महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत अक्कलकोट मतदारसंघातील विविध गावांमध्ये कॉर्नर बैठक पार पडली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत भाजप-महायुतीचा उमेदावार म्हणून मला ‘कमळ’ या चिन्हासमोरील बटण दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
गेल्या 5 वर्षात अक्कलकोट मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. तसेच लिंबीचिंचोळी, दिंडूर, वडगाव, तांदूळवाडी गावाचीही प्रगती झाली. गावातील नवीन झोपडपटटी येथे पेव्हर ब्लॉक बसवणे, जुना झोपडपटटी येथे सिमेंट रस्ता करणे, भिम नगर येथे सिमेंट रस्ता करणे, संत रोहिदास नगर येथे पेव्हर ब्लॉक बसवणे, दलित वस्ती नवीन झोपडपटटी येथे पेव्हर ब्लॉक रस्ता करणे, गावांतर्गत सिमेंट रस्ता व गटार करणे, रेवणसिध्द मंदिरासमोर सभामंडप बांधणे, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा सोय करणे आदी कामे पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहेत. तर नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे आणि लिंबीचींचोळी ते दिंडूर मध्ये रस्ता सुधारणा करणे ही कामे मंजूर असून लवकरच पूर्ण होतील अशी माहिती कल्याणशेट्टी यांनी यावेळी दिली .
यावेळी महेश बिराजदार, सुनिल कळके, पंडीत कुटे, श्रीशैल माळी, श्रीमंत किवडशेट्टी, संगमेश्वर हणमशेट्टी, मल्लीनाथ सुरवसे, दिनेश हणमशेट्टी, रूस्तम पटेल, जैनु माशाळे, अमोल गायकवाड, अक्षय कलशेट्टी, गेनसिद्ध माळी, मल्लीनाथ किवडशेट्टी, सदाशिव कुलकर्णी, बाबुशा रेड्डी, शबीर जमादार, पंकज पाटील, मल्लु सुरवसे, राहुल होटगे यांच्यासह भाजप-महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.