विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट मतदारसंघातील पालापूर गावात सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 5 वर्षात गावासाठी केलेल्या विकास कामांचा आढावा गावकऱ्यांना दिला आणि त्यांना महायुतीला भरघोस मतदान करावे अशी विनंती सचिन कल्याणशेट्टी केली.
पालापूर येथे किणीवाडी ते पालापूर रस्ता सुधारणा, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा सोय, हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे अशी कामे पूर्ण झाली आहेत.
त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी सभागृह बांधकाम, बिरोबा मंदिर परिसरात सिमेंट रस्ता, अंगणवाडी इमारत दुरुस्ती, पालापुर येथे अंतर्गत सिमेंट रस्ता, किणी ते पालापूर- बोरगाव रस्ता या कामांना मंजुरी मिळालेली आहे याबद्दल त्यांनी माहिती दिली .
याप्रसंगी शेकप्पा कलकुटेज, प्रभाकर मजगे, अमोल हिप्परगी, अप्पासाहेब बिराजदार, अबूबकर शेख, शरणप्पा मंगाणे, घाळय्या मठपती, प्रदीप जगताप, बसवराज शेळके, संजयकुमार भोसले, राहुल काळे, मधुकर पाटील, गुरूशांत कोळी, सुरेश बेलंबे, प्रकाश बेळंबे, शिवराज मुनाळे, प्रभाकर गावडे, सुनील कलकुटगे यांच्यासह भाजप आणि महायुतीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.