येस न्युज मराठी नेटवर्क : काँग्रेस पक्षाने काही पराभूत उमेदवारांना पुनर्वसन करण्यासाठी तर काही नाराज आमदारांना खुश करण्यासाठी प्रदेश वर घेऊन त्यांची बोळवण केली आहे. काल नाना पटोले पटोले यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्यानंतर तब्बल सहा कार्याध्यक्ष आणि दहा उपाध्यक्ष निवडून अनेकांना खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे . काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या स्थापन झालेल्या राज्यातील सरकार मध्ये काँग्रेसचे बडे नेते म्हणून नावाजलेले सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती मात्र त्यांना पद्धतशीरपणे डावलण्यात आले आहे कार्याध्यक्ष हे पद देऊन प्रणिती शिंदे यांना खुश करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केल्यामुळे त्यांना आता मंत्रिपद मिळणे दुरापास्त झाले आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला प्रणिती शिंदे यांच्या रूपाने पालकमंत्री मिळेल ही आशा देखील फोल ठरली आहे. आमदार प्रणिती शिंदे आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील हे मंत्री पदासाठी इच्छुक होते मात्र दोघांनाही संधी मिळू शकली नाही त्यामुळे त्यांना कार्याध्यक्ष पद दिले आहे त्यामुळे आता प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद मिळणार नाही असाच संदेश पक्षाने गेला आहे. माजी मंत्री शिवाजीराव मोघे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील माजी मंत्री नसीम खान आणि चंद्रकांत हांडोरे यांना देखील कार्याध्यक्ष पद देण्यात आले आहे.