सोलापूर : सोलापूरमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अक्कलकोटचे स्वामी समर्थांचे स्वामींचे घर ही संकल्पना डोंबिवली ठाणे येथे सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. त्याला आ.सुभाष देशमुख यांनी नुकतीच भेट दिली. स्वामींचे घर या ठिकाणी स्वामींची दैनंदिन आरती, विधी व प्रसाद आदी कार्य दररोज सुरू आहे. त्याला भेट देत आ. देशमुख यांनी तेथील कामकाजाची पहाणी केली. यावेळी स्वामींचे घर प्रमुख माधवी सरखोत, सोलापूर सोशल फाउंडेशन सल्लागार अजित कंडरे,दत्ताजी घाडगे, राजकुमार गव्हाणे आदी उपस्थित होते.