येस न्युज मराठी नेटवर्क :राज्याचे माजी सहकारमंत्री तथा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आ.सुभाष देशमुख यांच्या विकास निधीतून सैफुल येथील उदय हौसिंग सोसायटी मधील सभामंडपाचे उद्घाटन सुभाष देशमुख यांच्या शुभहस्ते व प्रभाग 23 च्या नगरसेविका मेनका शिवराज राठोड यांच्या प्रमूख उपस्थितीत यावेळी सोसायटीचे चेअरमन बिराजदार, सचिव डॉ पवार सर,दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष महेश देवकर, डॉ. शिवराज सरतापे शहर चिटणीस, आनंद बिराजदार मंडल सरचिटणीस , परिवहन सभापती दैदिप्य वडापूरकर, सिद्धलिंग मसूती नरसिंग कोळी ,प्रभाकर पडवळकर, मयूर घुगे, वैभव कुलकर्णी महेश सासवे आणि सोसायटी मधील सर्व सभासद उपस्थितीत होते, यावेळी सोसायटीचे चेअरमन यांनी प्रास्ताविक करताना बापू साहेबांचे आभार मानले व ड्रेनेज पाईप लाईन व रोड करण्यासाठी निवेदन दिले , सोसायटीच्या वतीने बापूंचा सत्कार करण्यात आला बापूंनी पण ड्रेनेज आणि रस्त्याचा विषय लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.