नवी दिल्ली : आजपासून देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना लस पोहोचण्याची तयारी सुरु होणार आहे. पंजाब, आसम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये कोरोना लसीकरणाच्या तयारीच्या आढावा घेण्यासाठी दोन दिवसांची रंगीत तालीम करण्यात येणार आहे. प्लॅनिंग, इम्प्लिमेन्टेशन किंवा रिपोर्टिंग मेकॅनिजम पाहण आणि त्यात सुधारणा करणं हा देखील उद्देश या रंगीत तालीमचा आहे. सोबत प्लॅनिंग, इम्प्लिमेन्टेशन किंवा रिपोर्टिंग मेकॅनिजम पाहण आणि त्यात सुधारणा करणं हा देखील उद्देश या ड्राय रनचा आहे. ड्राय रनमध्ये कोरोना लसीसाठी कोल्ड स्टोअरेज आणि वाहतुकीची व्यवस्था, परीक्षण स्थळांवर गर्दीची व्यवस्था, सोशल डिस्टन्स यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.
आज पहिल्या दिवशी लसीकरणासाठी लागणारी पूर्वतयारी केली जाईल. यासाठी वेगवेगळे सेशन्स घेतले जातील. यात Co-Win अॅपवरील नोंदणी, लसीकरण मोहिम राबवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारीचं वाटप, ब्लॉक स्तरावरील लस वाहतुकीच्या साधनांची तयारी अशा बाबींचा समावेश असेल. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या प्रत्यक्ष लसीकरण कसे केले जाईल याची रंगीत तालीम घेतली जाईल.