सोलापूर :- राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी उपक्रम असलेला जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यात 11 जलरथाच्या माध्यमातून सर्व गावांमध्ये जलजीवन मिशन तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचे प्रबोधन करणे व धरण, तलावातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने अकरा जल रथ जनजागृतीसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत, त्या जल रथाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात हिरवा झेंडा दाखवून जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी भारतीय जन संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य केतनशहा व जिल्हा स्तरावरील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.