• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

प्रशासकीय इमारत परिसरात 11 जानेवारी रोजी स्वच्छता मोहीम राबवली जाणार…

by Yes News Marathi
January 9, 2025
in इतर घडामोडी
0
प्रशासकीय इमारत परिसरात 11 जानेवारी रोजी स्वच्छता मोहीम राबवली जाणार…
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इमारती मधील 14 शासकीय कार्यालयातील जवळपास 25 अधिकारी व 160 कर्मचारी सहभागी होणार

सोलापूर:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात जानेवारी 2025 रोजी राज्यातील सर्व अधिकारी यांना शंभर दिवस उद्दिष्ट प्रति बाबत सात कलमी कार्यक्रम देण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन आपले कार्यालय व आपला कार्यालय परिसर स्वच्छ ठेवण्याच्या अनुषंगाने जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय येथे सर्व विभाग प्रमुखांची नियोजन बैठक उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोषकुमार देशमुख व अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.


या स्वच्छता नियोजन बैठकीस जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, जिल्हा ग्राहक मंच न्यायालयाचे प्रबंधक प्रशांत तावडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सहसंचालक नलिनी टेंभेकर, नगर भूमापन संचालक गजानन पोळ, भूजलचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉक्टर मुस्ताक शेख, अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस. डी. जिंतूरकर, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी एस. बी. देशमुख, भूसंपादन क्रमांक 11 चे सहाय्यक महसूल अधिकारी बी. व्ही. वाघ नेहरू युवा केंद्राचे सुभाष चव्हाण, मत्स्य व्यवसाय विभागाचे राजेश पाटील, उपविभागीय अधिकारी सोलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक जी. ए. बिराजदार, सरांनी बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल लेंगरे आदी उपस्थित होते.


उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी मुख्यमंत्री महोदय यांनी शंभर दिवस उद्दिष्ट पूर्ती च्या अनुषंगाने विभाग कार्यालयाचे वेबसाईट अद्यावत करणे, इज ऑफ लिविंग संकल्पना काम करणे, शासकीय कार्यालय स्वच्छता मोहीम राबवणे, नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित प्रकरणी निकाली काढणे, उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे, शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना भेटी देणे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा सात कलमी कार्यक्रम राज्यातील सर्व अधिकारी यांना देण्यात आलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर या प्रशासकीय इमारतीमधील सर्व शासकीय विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी यांनी एकत्रित येऊन या इमारत परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून या अनुषंगाने दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी आठ ते दहा या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.


या प्रशासकीय इमारतीमध्ये व परिसरात उच्च व तंत्र शिक्षण विभाग जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर ग्रामीण उपविभागीय अधिकारी कार्यालय नगर भूमापन विभाग अन्न औषध प्रशासन नागरी समूह अन्नधान्य वितरण अधिकारी कृषी विभाग मत्स्य व्यवसाय वरिष्ठ भूवैज्ञानिक जिल्हा उपनिबंधक प्रकल्प संचालक निर्वाह केंद्र हे विभाग कार्यरत आहेत. या सर्व कार्यालया अंतर्गत जवळपास 25 अधिकारी व 160 कर्मचारी कामकाज करत आहे. परंतु या इमारत परिसरात खूप अस्वच्छता निर्माण झालेली असून इमारतीमध्ये अस्वच्छता सर्वत्र पसरलेली आहे त्या अनुषंगाने सर्व कार्यालय प्रमुखांनी एकत्रित येऊन सर्वप्रथम आपापले कार्यालय स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.


या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत प्रशासकीय इमारत परिसर मोहिमेची स्वच्छता करून करण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व अधिकारी कर्मचारी 100% उपस्थित राहणार आहेत. यापुढील काळात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी व चौथ्या शनिवारी परिसर स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत सर्वांचे एकमत झालेले आहे. परिसर स्वच्छ केल्यानंतर आपापल्या कार्यालयात प्रत्येक विभाग प्रमुखांनी त्यांची कार्यालये स्वच्छ व नीटनेटकी करून घेण्याचे ठरले. तसेच कार्यालयाबाहेर व्यवस्थित स्वच्छता ठेवून कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच आलेल्या नागरिकांची कामे वेळेत व गतीने होतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Previous Post

आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश : पिण्याच्या पाण्याचा सुटणार प्रश्न..

Next Post

जिजाऊ जयंतीनिमित्त झेडपी मराठा सेवा संघ शाखेतर्फे विविध कार्यक्रम

Next Post
जिजाऊ जयंतीनिमित्त झेडपी मराठा सेवा संघ शाखेतर्फे विविध कार्यक्रम

जिजाऊ जयंतीनिमित्त झेडपी मराठा सेवा संघ शाखेतर्फे विविध कार्यक्रम

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group