• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, September 10, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सात सूत्री कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय इमारत परिसरात ११ जानेवारी रोजी स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ..

by Yes News Marathi
January 11, 2025
in इतर घडामोडी
0
सात सूत्री कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय इमारत परिसरात ११ जानेवारी रोजी स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ..
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


शासकीय कार्यालय व परिसर हा आपल्या घराप्रमाणे स्वच्छ ठेवण्याचा संकल्प सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी केला
सुट्टी दिवशी स्वच्छता मोहिमेत सहभागी न झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच कार्यालयीन वेळेत स्वच्छता मोहीम राबवली जाणार

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जानेवारी 2025 रोजी राज्यातील सर्व अधिकारी यांना 100 दिवस उद्दिष्टपूर्ती बाबत सात सूत्री कार्यक्रम देण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन आपले कार्यालय व आपला कार्यालय परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार आज जवळपास 20 अधिकारी व 90 कर्मचारी यांनी एकत्रित येऊन सांघिकपणे इमारत परिसराची स्वच्छता मोहीम सुरू केली. सकाळी आठ ते दहा या कालावधीत सर्वांनी एकत्रितपणे झाडू हाती घेऊन स्वच्छता मोहीम सुरू केली व दोन तासातच जवळपास चार टन कचरा गोळा केला. गोळा झालेला कचरा महापालिकेच्या गाडीतून नेण्यात आला.

उपजिल्हाधिकारी तथा क्रमांक 3 चे भूसंपादन अधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या समन्वयातून प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभाग प्रमुख एकत्रित येऊन स्वच्छता मोहीम राबवण्यात चा निर्धार केला होता. या स्वच्छता मोहिमेला आज सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी अत्यंत उत्साहाने व उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे. आजच्या या मोहिमेत भूजल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती होती हे विशेष म्हणावे लागेल. दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्यासह त्यांचा संपूर्ण स्टाफ 100% उपस्थित राहील यासाठी दक्ष रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी केले.

तर भूजल चे माजी कर्मचारी यांचा मुलगा श्री. नागेश जाधव हाही वृत्तपत्रातील बातमी वाचून या स्वच्छता मोहिमेत वडिलांच्या स्मरणार्थ सहभाग नोंदवून पुढील सर्व स्वच्छता मोहिमेत आपण सक्रिय सहभाग देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या इमारत परिसरातील सर्व शासकीय विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांमध्ये असलेली सांघिक भावना खूप चांगली असून याच पद्धतीने काम करत गेले तर संपूर्ण इमारत परिसर व कार्यालय स्वच्छ तर होतीलच येथे येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील तसेच या इमारत मधील या स्वच्छता मोहिमेचा आदर्श इतर सर्व शासकीय कार्यालये घेतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली

या स्वच्छता मोहिमेमध्ये अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, जिल्हा ग्राहक मंच न्यायालयाचे प्रबंधक प्रशांत तावडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सहसंचालक नलिनी टेंभेकर, नगर भूमापन संचालक गजानन पोळ, भूजलचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉक्टर मुस्ताक शेख, अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस. डी. जिंतूरकर, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी एस. बी. देशमुख, भूसंपादन क्रमांक 11 चे सहाय्यक महसूल अधिकारी बी. व्ही. वाघ, नेहरू युवा केंद्राचे सुभाष चव्हाण, मत्स्य व्यवसाय विभागाचे मत्स्य विकास अधिकारी श्री. राजम, राजेश पाटील, उपविभागीय अधिकारी सोलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक जी. ए. बिराजदार, आदी व अन्य अधिकारी कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी मुख्यमंत्री महोदय यांनी शंभर दिवस उद्दिष्ट पूर्ती च्या अनुषंगाने विभाग कार्यालयाचे वेबसाईट अद्यावत करणे, इज ऑफ लिविंग संकल्पना काम करणे, शासकीय कार्यालय स्वच्छता मोहीम राबवणे, नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित प्रकरणी निकाली काढणे, उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे, शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना भेटी देणे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा सात कलमी कार्यक्रम राज्यातील सर्व अधिकारी यांना देण्यात आलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर या प्रशासकीय इमारतीमधील सर्व शासकीय विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी यांनी एकत्रित येऊन या इमारत परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून या अनुषंगाने दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी आठ ते दहा या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

या प्रशासकीय इमारतीमध्ये व परिसरात उच्च व तंत्र शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर ग्रामीण उपविभागीय अधिकारी कार्यालय, नगर भूमापन विभाग, अन्न औषध प्रशासन, नागरी समूह, अन्नधान्य वितरण अधिकारी, कृषी विभाग, मत्स्य व्यवसाय, वरिष्ठ भूवैज्ञानिक, जिल्हा उपनिबंधक प्रकल्प संचालक नेहरू युवा केंद्र, जिल्हा तक्रार निवारण मंच हे विभाग कार्यरत आहेत. या सर्व कार्यालय अंतर्गत जवळपास 25 अधिकारी व 160 कर्मचारी कामकाज करत आहे. परंतु या इमारत परिसरात खूप अस्वच्छता निर्माण झालेली होती. त्यामुळे स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.

या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत प्रशासकीय इमारत परिसर येथे झाला. यापुढील काळात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी व चौथ्या शनिवारी परिसर स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत सर्वांनी निर्धार व्यक्त केलेला आहे तसेच हा परिसर स्वच्छ करण्याबरोबरच येते पुढील काळात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना सुलभ ठरेल असे दिशादर्शक तसेच त्याच्या कार्यालयाचे चांगले नाम फलक लावण्यात येणार आहेत.

कार्यालयीन वेळेत विशेष स्वच्छता मोहीम-
या प्रशासकीय इमारत परिसरात जवळपास 25 अधिकारी व 160 कर्मचारी कार्यरत आहेत परंतु त्यातील काही अधिकारी व कर्मचारी हे बाहेर जाऊन येजा करतात त्यामुळे शनिवार रविवार त्यांना स्वच्छता मोहिमेत सहभाग घेणे शक्य झालेले नाही. तरी अशा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागणी नुसार त्यांच्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून त्याबाबतचा संदेश सर्वांना देण्यात येईल, अशी माहिती या स्वच्छता मोहिमेचे मुख्य समन्वयक उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली. तसेच स्वतःहून अधिकारी कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविण्याबाबत आग्रही मागणी करत असल्याबद्दल श्री. देशमुख यांनी त्यांचे कौतुक करून अशी मागणी म्हणजे या मोहिमेची वाटचाल चांगली होणार असल्याचे मत व्यक्त केले.

Previous Post

सुशील वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ, कराड व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध सोलापुरात फिर्याद दाखल

Next Post

देशमुख कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला जावा-ओमराजे निंबाळकर

Next Post
देशमुख कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला जावा-ओमराजे निंबाळकर

देशमुख कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला जावा-ओमराजे निंबाळकर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group