येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून सर्व शाळा बंद आहेत आता टप्प्याटप्प्याने कोरोना मुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यात येत आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कल्पनेतून सोलापूर जिल्ह्यात स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
लोकवर्गणीतून तसेच सामाजिक संस्थांच्या मदतीने आणि स्वतःच्या उस्फुर्त सहभागातून शिक्षकांनी शाळा परिसर सुशोभित करावा फुलांची छान झाडे लावावीत शाळेतील सर्व भिंती बोलक्या कराव्यात. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या परिपत्रक 1 डिसेंबर 2020 च्या परिपत्रकानुसार शाळा सौंदर्य करण्यासाठी ग्रामसेवक आणि इतर यंत्रणेत कडून सहकार्य घेऊन संरक्षण भिंत बांधणे, शाळा परिसरात वृक्ष लागवड करणे ,किचन शेड उभारणे शाळेचे मैदान व्यवस्थित करणे मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभा करणे ही कामे करावीत असे देखील स्वामी यांनी आपल्या पाच जुलै रोजी च्या परिपत्रकात सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 2798 प्राथमिक शाळा असून तीन हजार इतक्या शाळेच्या इमारती आहे. त्यामुळे या शाळांचा परिसर सुंदर दिसावा मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी शाळा परिसर सौंदर्याने नटलेला असावा या उद्देशाने सीईओ यांनी हे नाविन्यपूर्ण अभियान सुरू केले आहे.
अभियानाच्या पुर्वी शाळेच्या आतील आणि बाहेरील आठ ते दहा फोटो काढून पाठवावे तसेच अभियान संपल्यानंतर त्याच पद्धतीने फोटोग्राफ्स काढून तुलनात्मक अहवाल शिक्षण विभागाला सादर करावा प्रत्येक तालुक्यातून चार उत्कृष्ट शाळा निवडण्यात येणार असून त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे या स्वच्छ शाळा सुंदर शाळा या अभियानात स्वयंस्फूर्तीने शिक्षकांनी कामे करावीत असे आवाहन देखील स्वामी यांनी केले आहे.