बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदाचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला. यंदा बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के लागला आहे. तर, सर्वात कमी लातूर विभागाचा लागला आहे. लातूर विभागाचा निकाल 89.46 टक्के लागला आहे.
यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 89.51 टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.07 टक्क्यांनी अधिक आहे.