येस न्युज मराठी नेटवर्क : पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फौजदार चावडी ,आंबेडकर पुतळा, सिद्धेश्वर मंदिर या मार्गाने वाहनांचा ताफा घेऊन सिद्धेश्वर शाळेवरून बेगम पेठ आणि बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी शाखे समोरून ही वाहने स्पीकरवरून लोकांना सूचना देत रवाना झाली.सर्व सुजाण नागरिकांनी घरातच थांबावे असे आवाहन , माइक वरून करण्यात येत होते. बेगम पेठ परिसरातील तसेच सिद्धेश्वर पेठ परिसरातील रिकामटेकडी मुले रस्त्यावर क्रिकेट खेळताना आढळून आल्यानंतर फौजदार चावडी पोलीस स्टेशनची गाडी गल्लीबोळातून फिरू लागल्यानंतर ही सगळी मुले भराभर पळून गेली. त्यानंतर पोलिसांनी आपल्या घरातच राहण्याचे आवाहन करीत बेगम पेठ पोलीस चौकीकडे कूच केले.