सोलापूर : शहरातील 54 मीटर रस्ता अर्थात छत्रपती संभाजी महाराज चौक ते अवंती नगर.. मुक्ताईनगर पासून पुढे मंगळवेढा रोडला सी एन एक्स हॉस्पिटल जवळ क्रॉसिंग करणारा रस्ता. बऱ्याच वर्षापासून हा रस्ता गाजत आहे आता महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी या रस्त्याकडे विशेष लक्ष दिले आहे..डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये हा रस्ता 60 मीटर होता नंतर तो 54 मीटर करण्यात आला .प्रत्यक्ष जागेवर 21 मीटरच रस्ता आहे. उर्वरित जागा रिकामी आहे. त्यामुळे तिथे अतिक्रमण होऊ नये आणि डेव्हलपमेंट प्लॅन नुसार हा पूर्ण रुंदीने म्हणजे 54 मीटर रुंदीचा हा रस्ता करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्याबाबतच्या सूचना मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी नगर अभियंता संदीप कारंजे यांना दिल्या आहेत. या रस्त्याच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ वीस वर्षांपूर्वीच्या रस्त्यावरच 21 झोपड्या आहेत त्या झोपड्याचे 30 ऑक्टोबर पर्यंत इतरत्र दुसऱ्या जागेच्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. 30 ऑक्टोबर पर्यंत स्वतःहून झोपडपट्टी धारक न गेल्यास तेथील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. अवंतीनगर, वसंत विहार ,अभिमान श्री, मुक्ताईनगर राजेश कोठे नगर ,निखिल थोबडे नगर, कोयना नगर या भागातील नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आणि रहदारीचा आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वसाहतीकरण झाले आहे त्यामुळे हा 54 मीटर रुंदीचा रस्ता केल्यास भविष्यातील दळणवळणासाठी याचा चांगलाच फायदा होईल त्यामुळे या भागातील नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी देखील प्रशासनाकडे याबाबतचा पाठपुरावा करावा.