येस न्युज मराठी नेटवर्क : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचा फटका शेतकरी आंदोलनाला बसल्याचं आता दिसून येत आहे. दिल्ली आणि हरयाणादरम्यान, सिंघू सीमेवर नागरिकांनी मोर्चा काढला. आजूबाजूच्या खेड्यात राहणारे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ते सिंघू सीमेवर जमले आहेत. आंदोलन करणार्या शेतकर्यांनी आता सिंघू सीमा रिकामी करावी. लाल किल्ल्यावर घडलेल्या हिंसक घटनेने आम्ही दुखावले गेले आहेत. आम्ही राष्ट्रध्वजाचा अपमान सहन करणार नाही. बरेच दिवस झाले. आता सिंघू सीमा रिकामी करा. या काळात आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला, असं त्यांचं म्हणणं आहे. सींघू सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात आहेत. पोलिस रस्त्याच्या एका बाजूला बॅरिकेड्स लावण्याच्या प्रयत्नात आहेत. पण त्याला आंदोलकांचा विरोध आहे.प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर चिल्ला सीमेवरील धरणे आंदोलन संपुष्टात आले आहे. गाझीपूर सीमेवरील तंबूही जवळजवळ हटवण्यात आले आहेत.आंदोलकांना रस्त्याच्या एका ठिकाणावरून दुसरीकडे जाण्यासाठी सिंघू सीमेवर बॅरिकेडींग करून पोलिस बंदोबस्त करत आहेत. पण आंदोलकांचा त्याला विरोध आहे. एकूण सिंघू सीमेवरील परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.