सोलापूर : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिन हा भारतामध्ये “राष्ट्रीय बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती संचलित सोलापूर रेल्वे चाईल्ड हेल्प डेक्सतर्फे समितीच्या संचालिका सपना चिट्टे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे रेल्वे व्यवस्थापक आर. के. सिंह व रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस उपनिरीक्षक अनुज पटेल यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाप्रसंगी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस उपनिरीक्षक अनुज पटेल आपल्या मनोगतात चाईल्ड हेल्प डेक्सचे करावे तितके कौतुक कमीच आहे, खऱ्या आई-वडिलांची ओळख पठवून त्यांची खातरजमा करूनच मुलांना आई-वडिलांच्या ताब्यात देणे अशाप्रकारे ही संस्था कार्य करत असते व त्यांना आमची पूर्ण मदत दिली जाते असे ते म्हणाले. रेल्वे व्यवस्थापक सिंह म्हणाले स्टेशनवर कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ती देण्याचे आश्वासन यावेळी बोलताना सांगितले. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सब इंस्पेक्टर जे.एस. कदम,रेल्वे सुरक्षा बलाचे ए. एस.आय. श्याम सिंह, जेईई इलेक्ट्रिक विभागाचे कुलदीप वर्मा आणि एसईई इलेक्ट्रिक विभागाचे किशोर मुळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेल्वे चाईल्ड हेल्प डेक्सचे समन्वय मल्लिनाथ तमशेट्टी यांनी केले तर आभार चाईल्ड हेल्प डेक्सचे समुपदेशक गुरप्पा भाईकट्टी यांनी मानले. लहान मुलांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू ही देण्यात आले. तसेच या कार्यक्रमासाठी सोलापूर लोहमार्ग पोलीस स्टाफ धंगेकर, गायकवाड, क्षीरसागर, राठोड, जमादार, टीम मेंम्बर अनोज कदम, मानतेश मुगली, योगेश सुतार, विश्वेश्वर वाघमारे, ऊर्मिला बनसोडे, वैशाली बाळशंकर, गणेश नंदल आणि विनय व्होटकर उपस्थित होते.