सोलापूर दि.25 (जिमाका):- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अंतर्गत चाईल्ड हेल्प लाईन 1098 शासकीय यंत्रणा, अक्षय तृतीया च्या शुभमुहूर्तावर होणारे बालविवाह थांबविण्यासाठी सतर्क असल्याची माहिती
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.बी.काटकर यांनी दिली.
भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्वाची आणि सार्वत्रिक सामाजिक क्रिया आहे. साहजिकच शुभमुहूर्तावर विवाह विधी केल्या जातात. अक्षय तृतीय हा महत्वाचा मुहूर्त असल्याने या शुभ मुहूर्तावर सामुदायीक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह होऊ न देणे कारण बालविवाह ही प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार असे विवाह बेकायदा ठरतात आणि याविरोधात गुन्हा नोंदविला जातो.
चाईल्ड हेल्प लाईन 1098 हे ज्या बालकांना काळजी व संरक्षणाची गरज आहे अशा बालकांना सेवा पुरविते. यात रस्त्यावरील बालके, बालकामगार, शोषित बालके, देह विक्रीस बळी पडलेली बालके, व्यसनाधीन बालके, संघर्षग्रस्त बालके, मतिमंद बालके, एच. आय. व्ही. एड्स ग्रस्त बालके, आपत्तीग्रस्त बालके, कौटुंबिक कलहास बळी पडलेली बालके, वैद्यकिय मदतीसाठी, निवाऱ्याच्या शोधात असलेले, हरवलेले बालके परत पाठवणेसाठी, शोषणापासून संरक्षण, भावनिक मदत व मार्गदर्शन, माहिती व संदर्भ सेवेकरिता चाईल्ड हेल्प लाईन 1098 हि 24 तास मोफत सहाय्य करणारी महाराष्ट्र राज्य, महिला व बाल विकास विभागाची राष्ट्रीय दुरध्वनी सेवा आहे. आणि माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार विवाहातील मुलीचे वय 18 वर्षे व मूलाचे वय 21 वर्षे पुर्ण असले पाहिजे जर वय त्यापेक्षा कमी असले तर ते बालविवाह मानले जाते. जर कोठे आपल्या आसपास बालविवाह होत असल्यास स्थानिक पोलीस स्टेशनला, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अथवा चाईल्ड हेल्प लाईनच्या टोल फ्री नंबर 1098 वर कळवावे असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.बी.काटकर यांनी केले आहे.