No Result
View All Result
- मुंबई – राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, राज्यभरात काल ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
- शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे. यादृष्टीनं महसूल यंत्रणेनं लगेच कामाला लागावं आणि पंचनामे करावेत, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं ऐन काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं आहे.
- मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.
- राज्यात अवकाळी पावसाची हजेरी
हवामान विभागानं राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यातच ठाणे, कल्याण-डोंबिवली, धुळे, जळगाव या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. ठाण्यात होळी दहनाचा कार्यक्रम सुरू असतानाच पावसानं बरसायला सुरुवात केली. तर कल्याण, डोंबिवली, भिवंडीतही पावसानं दिवसभर हजेरी लावली. दुसरीकडे जळगावमध्ये अवकाळी पावसानं आणि धुळे जिल्ह्यात गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान केलं आहे.
- कल्याण डोंबिवलीत मध्यरात्री रिमझिम पाऊस
हवामान खात्याकडून येत्या काही महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात गुरुवारी (7 मार्च) काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यातच दुपारी चारनंतर अचानक सोसाट्याच्या वारा सुटला होता. वाऱ्यासोबत धूळही हवेत उडाल्याने कल्याण डोंबिवलीत धुळीचं साम्राज्य पाहायला मिळालं तर मध्य रात्रीच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसाने हजेरी लावली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.
- पालघर जिल्ह्यात वीज पडून आग लागल्याच्या घटना
पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आजही ढगाळ वातावरण आहे. तर रात्री वेगवेगळ्या भागात पावसाच्या सरी बरसल्या असून आंबा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर या अवकाळी पावसाचा फटका बागायती शेतीबरोबरच रब्बी पीक वीट भट्टी व्यवसायिक आणि गवत पावली व्यवसायालाही बसला आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी उंच झाडांवर आकाशी वीज पडून आग लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. वडराईमध्ये नारळाच्या झाडावर तर वेति मध्ये ताडाच्या झाडावर आकाशी वीज पडून आग लागली.
No Result
View All Result