येस न्युज मराठी नेटवर्क । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्याशी संवाद साधून आगीविषयी त्यांच्याकडून माहितीही घेतली