मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. श्रीमती रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. ध्वजास सलामी देणारे पोलिस पथक, ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.