मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा फडणवीसला दहावीच्या परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळाले आहेत. तसंच वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या कुटुंबासह राहण्यास गेले आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर वास्तव्यासाठी गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे.