येस न्युज मराठी नेटवर्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाच्या दबावाला बळी पडत नाही. वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातील निर्णय घ्यायला मुख्यमंत्री सक्षम आहेत, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच माझं ट्विट मुख्यमंत्र्यांना उद्देशून नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.
राठोड यांच्या राजीनाम्यावर राऊत म्हणाले, वेट अँड वॉच
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांना विचारलं असता ते काहीशे माध्यमांवर भडकलेले पाहायला मिळाले. संजय राठोड यांच्यावरील निर्णय घ्यायला मुख्यमंत्री आहेत, तपास यंत्रणा आहे, पोलिस आहे, न्यायालय आहे. तुम्ही कशाला न्यायालयाच्या भूमिकेत जाताय, असा सवाल त्यांनी माध्यमांना विचारला. तसंच पुढे जाऊन वेट अँड वॉच, अशी सूचक प्रतिक्रियाही त्यांनी दिली.