दिपावाळी च्या पहिल्या दिवशी शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान प्रणित छत्रपती संभाजी महाराज चरणी 501 दिवे अर्पण करण्यात आले. ज्यांच्यामुळे आज आपण सुखाने जगतोय. हिंदु सण उत्साहात साजरा करतोय त्यांची स्मारक मात्र अंधारात राहता कामा नये म्हणुन संभाजी महाराज चौक येथे दिवे लावण्यात आले. चौक पुर्णतः दिव्याने उजळुन निघाला. विविध फुलांची सजावट, शंभुराजे स्मारकास वंदन करुन प्रेरणा मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात केली, शिवसेवकांनी मशाल लावुन ५०१ दिवे अर्पण करण्यात मग्न झाले.
प्रथम सोलापुर शहरात दिपोत्सव कार्यक्रम करण्यात आले. यावेळी शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष मारुती सुरवसे बोलताना म्हणाले की अखंड हिंदुस्थान पारतंत्र्याच्या अंधकारात अडकला असताना रयतेच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, मंदिरावरील कळस वाचवण्यासाठी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची प्रकाश ज्योत तेवत ठेवले ते शाहजिजा शिवशंभु यांचा इतिहास आपल्याला विसरता येत नाही यांच्यामुळेच आज आपण सण उत्साहात जल्लोषात साजरा करतो, आपल्या माता भगिनी सुरक्षित आहेत, शेतकरी सुखाने नांदतोय. ते फक्त आणि फक्त शाहजिजा शिवशंभु यांच्या मुळेच याच कारणाने शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान एक दिवा शाहजिजा शिवशंभु चरणी अर्पण करण्यासाठी संभाजी महाराज चौकात ५०१ दिवे लावून दिपोत्सव सोहळा साजरा केला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष मारुती सुरवसे, सहसचिव अमोल डोंगरे, जिल्हाध्यक्ष राहुल बाके, शहर अध्यक्ष पृथ्वीराज राजपूत, अभिजीत पवार, विठ्ठल जमादार, नारायण मयेकर, आदी शिवसेवक बांधव उपस्थित होते.