सोलापूर : सोलापूर शहरात शरदचंद्र प्रशालेत राजगड प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या छत्रपती राजगड प्रीमियर लीगचा अंतिम सामना गुरु सी सी या टीमने जिंकला. हि प्रीमियर लीग स्पर्धा 7 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबरच्या दरम्यान पार पडली. अंतिम सामना गुरु सीसी आणि राजगड क्रिकेट क्लब यांच्यात पार पडला. यामध्ये गुरु सी सी टीमने चार विकेट राखून हा सामना जिंकला. अंतिम सामन्यासाठी अंपायर असलेले सोन्या भोसले हे प्रमुख आकर्षण होते.डान्सिंग,कॉमेडी यामुळे सोन्या भोसले यांनी अंतिम सामन्यात प्रक्षेकांची मने जिंकली.
७७७७ रुपयाचे प्रथम पारितोषिक माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते गुरु सिसी टीमला मला देण्यात आले. ५५५५ द्वितीय पारितोषिक राजगड क्रिकेट क्लबला मिळाले तर ३३३३ तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अभिसिद्ध क्रिकेट क्लब मिळवले. पारितोषक वितरण समारंभाच्या वेळी माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यासह ज्ञानेश्वर सपाटे,गणेश जाधव, सागर शिंदे,शिवाजी भोसले आदी उपस्थित होते. यावेळी माजी महापौर मनोहर सपाटे बोलताना म्हणाले कि …
ही प्रीमियर लीग यशस्वी करण्यासाठी रोहित काळे,शुभम धुमाळ,सचिन भोसले, रोहन येळणे,शुभम कोलारकर,वेंकटेश साखरे,माऊली जाधव, रुपेश शिंदे,प्रसाद चोरमुले,आदित्य पाटील,वैभव धोडमिसे तसेच अंपायर म्हणून अनंत तावस्कर,विष्णू लांडगे,अक्षय मेटकरी आदींचे सहकार्य लाभले.