येस न्युज मराठी नेटवर्क : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी सकाळी ७ वाजता ईडीच्या पथकाने छापा टाकला. आज दिवसभरात राऊतांची चौकशी होण्याची शक्याता आहे. तसेच संजय राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. ‘मी शिवसेना सोडणार नाही’, असं ते म्हणाले. ईडीच्या कारवाईनंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर शिंदे गटाकडून या कारवाईचे समर्थन करण्यात येत आहे.