सोलापूर : सोलापुरातील होटगी रोडवर चव्हाण ट्रेडिंग कंपनीच्या सुसज्ज शोरूमचे उद्घाटन बुधवारी माजी महापौर पुरणचंद्र पुंजाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाबू चव्हाण ,घनश्याम चव्हाण ,केतन शहा ,सतीश मालू,. सुरेश फुलमारी, दिलीप पेठे, दीपक मुनोत,माडकर वकील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते फित कापून तसेच दीपप्रज्वलन करून पाहुण्यांच्या हस्ते या शोरूमचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर पहिले ग्राहक डॉक्टर तोष्णीवाल यांना 165 सेंटिमीटर लांबीचा TV. मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. आपल्या मनोगतामध्ये माजी महापौर पुरणचंद्र . पुंजाल यांनी चव्हाण बंधू चे कौतुक करत त्यांच्या वाटचालीच्या आठवणी सांगितल्या.त्यावेळी बाबू चव्हाण यांनीदेखील ग्राहकांच्या विश्वासामुळेच चव्हाण उद्योग समूहाची भरभराट सुरू असल्याचे सांगितले.यावेळी विविध मान्यवरांनी चव्हाण बंधूंना शुभेच्छा दिल्या.