येस न्युज मराठी नेटवर्क : चव्हाण उद्योग समूहाचे ग्राहक सेवेचे आणखी एक पाऊल सोलापूर, बार्शी, करमाळा यानंतर कुर्डुवाडी येथे रॉयल एनफिल्ड बुलेट शोरूम व अद्यावत सर्विस सेंटर चे शुक्रवार दिनांक २३ जुलै २०२१ रोजी गुरुपौर्णिमा चे औचित्य साधून भव्य असा शुभारंभ करण्यात आला.
या शोरूमचे उद्घाटन लोकप्रिय आमदार संजय (मामा) शिंदे यांच्या शुभहस्ते लाल फीत कापून संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी चव्हाण उद्योग समूहाचे प्रमुख शिव प्रकाश चव्हाण तथा कुर्डूवाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर भाई मुलाणी, शिवसेना जिल्हाध्यक्ष धनंजय डिकोळे, कुर्डूवाडी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे व तसेच कुर्डूवाडी लोहमार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर कदम हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चव्हाण मोटर्स मुख्य व्यवस्थापक नागेश वाघमारे यांनी केले.