येस न्युज मराठी नेटवर्क :सोलापूरच्या विमान सेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी आता धर्मराज काडादी यांच्या चांगलेच अंगलट येऊ लागली आहे. खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पत्रकार परिषदेमध्ये काडादी यांच्यावर टीका केली. ही बेकायदेशीर चिमणी स्वतःहून काढून घेतो असे लेखी पत्र धर्मराज काडादी यांनी दिली होते. त्यांनी बोलल्या प्रमाणे वागावे असा टोमणा खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी लावला आहे. दुसरीकडे सिद्धेश्वर कारखान्याचे तज्ञ संचालक संजीव थोबडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेऊन काडादी यांच्या बेकायदेशीर कृत्यांचा पाढाच वाचला आहे .बेकायदेशीर कामे करणे काडादी यांच्या अंगवळणी पडले आहे चिमणी मुळे सोलापूरची विमानसेवा सुरू होत नाही. कोर्टाने आदेश दिला असताना काडादी दिशाभूल करत आहेत त्यामुळे सोलापूरचे नुकसान झाले असून कारखान्याचे देखील साडेतीनशे कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे थोबडे यांनी म्हटले आहे.