सोलापूर : बाळे येथील संतोष नगर मध्ये राहणारे सुशांत सुरेश काकडे यांचा सॅमसंग कंपनीचा ६,००० रुपयांचा मोबाईल घरातून अज्ञात इसमाने चोरून नेला आहे. १६ मे रोजी रात्री ९:१५ ते ९:३० च्या दरम्यान चार्जिंग साठी लावलेल्या मोबाईलची चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे हवालदार साखरे अधिक तपास करीत आहेत.
मोटारसायकलवरून शेळीसह पिल्लू पळविले….
सोलापूर : विजापूर रस्त्यावरील प्रताप नगर येथील तानाजी शामराव पवार यांच्या मालकीची पंधरा हजार रुपयांची काळ्या रंगाची शेळी व त्या शेळीचे पिल्लु अज्ञात इसमांनी मोटरसायकलवरून चोरून नेल्याची फिर्याद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही चोरी २२ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास झाली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पाडवी अधिक तपास करीत आहेत.