मुंबई : महाराष्ट्र सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत. तसंच डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेलं निलंबन आदेशही मागे घेतले आणि निलंबनाचा कालावधी ऑन ड्युटी असल्याचं मानलं जावं, असं आदेशात म्हटलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर परमबीर सिंह यांच्यावरील आरोप आणि त्यांचं निलंबन रद्द केलं आहे.